संप बेकायदेशीर प्रशासनाने कारवाई करावी

संप बेकायदेशीर प्रशासनाने कारवाई करावी

औरंगाबाद / प्रतिनिधी - महाराष्ट्र राज्य महाविद्यालयीन व विद्यापीठीय सेवक संयुक्त कृती समितीने विविध मागण्यांसाठी    दी. २२ नोव्हेंबर  रोजी जो संप केेेेेला  होता हा संप बेकायदेशीर आहे  व या संदर्भात प्रशासनाने योग्य कारवाई करावी असे अनेकांचे मत आहे. 
     महाराष्ट्र राज्य महाविद्यालयीन व विद्यापीठीय सेवक संयुक्त कृती समितीने विविध मागण्यांसाठी आंदोलनाचे हत्यार उपसले आहे. मुळात हे आंदोलन विद्यार्थ्यांना वेठीस धरण्याचे षडयंत्र आहे. ज्या मागण्यासाठी आंदोलन करण्यात येतेय, त्या मागण्यांसाठी अनेकजण न्यायालयात गेले आहे. यासंदर्भातील निर्णय प्रलंबित असताना न्यायालयाचा अपमान एकप्रकारे आंदोलनकर्ते करत आहे. बेकायदेशीरपणे आंदोलनात सहभागी झालेल्या अधिकारी, कर्मचाऱ्यांवर प्रशासनाने कारवाई करावी. डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील २४ कर्मचारी न्यायालयात गेले आहेत. अनेकजण सेवानिवृत्त झाले आहेत. मग इतर कर्मचाऱ्यांचा संबंध नसतानाही ते मौज म्हणून आंदोलनात सहभागी झाल्याचे दिसून येत असून त्यांच्यावर कठोर कारवाई व्हायलाच पाहिजे. असे मत डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ मागासवर्गीय शिक्षकेतर कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष सुभाष बोरीकर यांनी मांडले आहे. 

आमच्या बातम्या WhatsApp वर मिळवण्यासाठी येथे क्लिक करा