पोलीस बॉईज असोसिएशनतर्फे जनरल कै बिपिन रावत यांना श्रद्धांजली
औरंगाबाद / प्रतिनिधी - भारतीय हवाई दलाचे एम आय 17 व्ही 5 हेलिकॉप्टर दि. 8 डिसेंबर रोजी कोसळून झालेल्या अपघातात भारताचे पहिले संरक्षण दल प्रमुख शीट ऑफ डिफेन्स टॉफ कैलासवासी बिपिन रावत यांच्यासह बारा जवानांना वीरमरण आले.
या सर्वांना आज महाराष्ट्र पोलीस बॉईज असोशियन तर्फे क्रांती चौक येथे श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. यावेळी संस्थापक अध्यक्ष रवी वैद्द यांनी श्रद्धांजली अर्पण करताना सांगितले की स्वर्गीय बिपिन रावत यांच्या रूपाने देशाने एक सच्चा देशभक्त गमावला आहे. त्यांच्या जाण्याने देशाचे कधीही न भरून निघणारे नुकसान झाले आहे. चीन सारख्या बलाढ्य शत्रूला त्यांच्याच भाषेत उत्तर देऊन आता हिंदुस्तान हा 1971 चा हिंदुस्तान तर राहिलेला नाही हे ठणकावून सांगणारा निधड्या छातीचा योद्धा आज देशाने गमावला आहे. ज्या वीर सैनिकांमुळे आम्ही सर्व देशवासी सुरक्षित आहोत अशा या खरा देशभक्त हिरोंना आज श्रद्धांजली अर्पण करताना मन भरून आले आहे, अशा महान योद्ध्यांचा आपण सर्वांनी आदर्श घेऊन देश कार्य करावे हीच खरी त्यांना श्रद्धांजली होईल असे सांगून वीर मरण आलेल्या सर्वांना श्रद्धांजली अर्पण केली. यावेळेस मराठवाडा अध्यक्ष राज ठाकरे, कोर कमिटी मेंबर उमेश कुमावत, अध्यात्मिक आघाडी प्रदेशाध्यक्ष योगेश माऊली सुरळकर, जिल्हाध्यक्ष शिरीष चव्हाण, श्याम इंगळे, राजू वाडेकर, दत्ता सोनवणे, विद्यार्थी आघाडीचे सागर बनसोडे, सलमान सय्यद, इमरान शेख, समीर खान, विकास गोखले, गौतम हीवसारे, विशाल गुजराती, अविनाश अंदुरे, या सर्वांनी उपस्थित राहून श्रद्धांजली अर्पण केली.