नवीन आशयघन घेऊन येतोय  'फास'

नवीन आशयघन घेऊन येतोय  'फास'

औरंगाबाद / प्रतिनिधी - अविनाश कोलते यांच्या दिग्दर्शनाखाली तयार झालेला आशयघन 'फास' ४ फेब्रुवारीला प्रदर्शित होणार आहे.हा 'फास' नेमका कुणाचा आहे. कुणी घेतलेला आहे या सर्वांची उत्तर प्रेक्षकांना पुढील महिन्याच्या पहिल्या आठवड्यात त्यांच्या जवळच्या चित्रपटगृहांमध्ये मिळणार आहेत.

वरवर पाहता हा चित्रपट केवळ शेतकरी आणि त्यांच्या व्यथा मांडणारा असेल असे वाटणं स्वाभाविक आहे. पण लेखिका माहेश्वरी पाटील चाकूरकर यांनी शेतकऱ्यांना केंद्रस्थानी ठेवून समाजातील विविध घटकांच्या गळ्याशी आवळला गेलेला 'फास' या चित्रपटात आपल्या लेखनाद्वारे मांडला आहे. अविनाश कोलते यांनी तो तितक्याच संवेदनशीलतेन पडद्यावर सादर केला आहे. पोलिस, डॉक्टर, सरकारी कर्मचारी प्रत्येकाच्या आयुष्यात काही ना काही समस्या आहेतच. प्रत्येकाला कोणत्या ना कोणत्या गोष्टीची भीती आहे. कोलते यांनी 'फास'च कथानक पडयावर सादर करताना यांसारख्या विविध पैलूंना स्पर्श करण्याचा यशस्वी प्रयत्न केला आहे. शेतकरी का फास लावून घेतो. त्याची कारण काय, तो इतका हतबल का होतो. त्याच्या पश्चात कुटुंबियांचं काय होतं. त्याच्या मुलांच्या डोळ्यांत कधी स्वप्नं तरळतच नाहीत का, वडीलांनी गळफास घेतल्यावर मनःस्थितीचा कोणी विचार करतो का... असा सर्व प्रश्नांची उत्तर 'फास' चित्रपटात कोणतेही उपदेशाचे डोस न पाजता परीपूर्ण मनोरंजनाच्या माध्यमातून मिळणार आहेत. फास केवळ जगाचा पोशिंदा असणाऱ्या शेतकऱ्याच्या गळ्याभोवती नसतो. तर शहरातील लोकांच्याही गळ्याभोवती असतोच. याचसाठीच हा चित्रपट ग्रामीण भागातील प्रेक्षकांच्या जोडीला मेट्रो सिटीमधील नागरिकानीही अवश्य पाहण्याजोगा आहे.

माँ एंटरटेनमेंट प्रस्तुत माहेश्वरी पाटील चाकूरकर निर्मित 'फास'ची सहनिर्मिती नरेश पाटील, पल्लवी पालकर, दयानंद अवरादे बसवराज पाटील, अनिल पाटील, वैशाली पट्टेवाड यांनी केली आहे. फास' या चित्रपटाचं आणखी मुख्य वैशिष्ट्य म्हणजे जगभरातील सिनेमहोत्सवांमध्ये या चित्रपटावर कौतुकासोबतच पुरस्कारांचाही वर्षाव झाला आहे. सिनेमहोत्सवांमध्ये येणाऱ्या जाणकार प्रेक्षकांच्या जोडीलाच समीक्षकांनीही 'फासची पाठ थोपटली आहे. आजतागायत या चित्रपटानं १३० पेक्षा अधिक पुरस्कारांवर आपले नाव कोरलं आहे. कसदार कलावंतांचा दमदार अभिनय हे 'फास'चे आणखी एक वैशिष्ट्य आहे. राष्ट्रीय पारितोषिकावर आपले नाव कोरणारा उपेंद्र लिमये हा आघाडीच्या अभिनेत्यानं या चित्रपटासाठी पोलिसी युनिफार्म चढवला आहे. पोलिस कर्मचाऱ्याच्या भावभावनांसोबतच त्यांच्या अडचणींचा आलेखही या चित्रपटात दाखवण्यात आला आहे. कमलेश सावंतन शेतकऱ्याच्या मुख्य भूमिकेत लक्षवेधी अभिनयाचं दर्शन घडवलं आहे. सयाजी शिंदेसारख्या मातीतील कलाकारान साकारलेला डॉक्टरही पाहण्याजोगा आहे. याखेरीज पल्लवी पालकर, गणेश चंदनशिवे, नामदेव पाटील, निलेश बडे, ज्ञानेश उडगवकर, उमेश राजहंस, शरद काकडे, ईश्वर मोरे, पवन वैद्य, विनय जोशी, देवा पांडे, पूजा तायडे, तेजस्विनी, माधुरी भारती आणि श्रुतिका लोहे या सर्वच कलाकारांनी सुरेख अभिनय करत मुख्य कलाकारांना मोलाची साथ दिली आहे. सिनेमॅटोग्राफर रमणी रंजन दास याची अफलातून सिनेमॅटोग्राफी आणि अपूर्वा मोतीवाले व आशिष म्हात्रे यांनी केलेलं अचूक संकलन या फासच्या गोष्टीही उजव्या ठराव्या अशाच आहेत. संतोष समुद्रे यांनी कला दिग्दर्शन केलं आहे. 'फास' च्या रूपात दर्जेदार निर्मितीमूल्यांनी सजलेला एक आशयघन चित्रपट रसिकांच्या सेवेत हजर झाला आहे.

आमच्या बातम्या WhatsApp वर मिळवण्यासाठी येथे क्लिक करा