मकर संक्रात की जीवावर संक्रात

मकर संक्रात की जीवावर संक्रात

पीसीएन. स्पेशल :-  सण म्हणजे आनंद,प्रेमाची देवाण घेवाण परंतू आज  आपण सण साजरा करतोय की लोकांचे जीव घेतोय हेच कळायला मार्ग उरला नाही़ हिंदू धर्मातील अगदी पवित्र मानला जाणारा मकर संक्रात हा सण म्हटल्यावर आपल्या डोळ्यासमोर तीळगुळ, पतंगबाजी या  सर्व गोष्टी  येतात़ परंतू आज मकर संक्रात म्हटल की मांजा आणि मृत्यू हेच चित्र डोळ्यासमोर येतं 

खरच हेच  वास्तविक रूप आहे का आपल्या सणाच? काळानुसार सर्वच गोष्टीेंच स्वरूप बदलत जात़ सण साजरा करण्याच्या पध्दतीही बदलत गेल्या आणि हे सण साजरा करणे म्हणजे फक्त आपला म्हणजे माझा आनंद उरला़ त्याचा दुसऱ्याला काय त्रास होतो याच्याशी कोणाला काही देणे घेणे नाही़ प्रत्येक गोष्टीसाठी मर्यादा ही निश्चित केली गेली आहे परंतू आज कोणीही कोणत्याच बाबतीत मर्यादांच पालन करत नाही़ त्यामुळे प्रत्येक गोष्टीतील स्वारस्य आनंद नष्ट होत चालला आह़े त्याचे वास्तविक स्वरूप बदलून गेल त्यामुळे त्यातला गोडवा ही नष्ट झाला आह़े उरली आहे ती फक्त औपचारीकता आणि विभत्सपणा़ 

लोकांच्या जीवाशी खेळ
   मकर संक्रात जवळ येताच आपल्याला आता पतंग उडवायला मिळणार या विचाराने फक्त लहान मुलेच नाही तर सगळ्यांनाच आनंद होतो कारण आपल्या देशात सर्वच वयोगटातील व्यक्ती पतंग उडवतात़. पतंग उडवण्यापुरताच आनंद आता मर्यादीत राहीला नाही कारण ती आता स्पर्धा झाली आहे़. माझा पतंग कोणी काटला नाही पाहीजे आणि मी तर त्याचा पतंग काटून त्याला हरवणार ही भावना जोर धरत आहे़. यासाठी मग कोणत्याही थराला जाण्याची तयारी कारण आपण समोरच्याचा पतंग काटून त्याला हरवल म्हणजे आपण विश्वविजेता ठरणार हे निश्चित़. वर्ल्डकप आपलाच़. काय हा वेडेपणा? त्याला कोणतीच सीमा नाही. खेळाचा आनंद हा खेळापुरताच असला पाहिजे त्यामुळे कोणाचा जीव जात असेल तर तो लोकांच्या जीवाशी खेळ ठरतो़.
       जींकण्याच्या भावनेने लोक दुष्परीणामाचा विचार करत नाहीत़ नायलॉन मांजा आणि चायनीज मांजा चा सर्रास वापर पतंग उडविण्यासाठी केला जातो. नायलॉन व चायनीज मांजा अतिशय घातक आहेत. हे मांजा बनवतांना काचेचा चुरा व घातक रसायनांचा वापर केला जातो त्यामूळे हे दोरे सहजासहजी तुटत नाहीत. इतकेच नाही तर जास्त हाताळल्यानंतर आपल्या हाताला देखील यामुळे गंभीर जखमा होतात़ सर्वात मोठी दुर्दैवाची गोष्ट म्हणजे या मांजामुळे आजतागायत शेकडो व्यक्तींचा जीव घेतला आहे व घेत आहे. तरीदेखील लोकांनी याचा वापर बंद केलेला नाही़. सर्वच वयोगटातील व्यक्तींचा या मांजामुळे जीव गेला आहे अगदी चीमुरड्यांचा सुध्दा तरीही लोकांना थोडीशीही खंत वाटत नाही़  वर्षभर या मांजामुळे अनेकांचा जीव जातो  मकरसंक्रातीला मात्र याचे प्रमाण वाढलेले असते़. राज्य सरकारने  या मांजावर सक्तीची बंदी केली आहे तरीही त्याची निर्मिती व विक्री होते़. लोकांनी जर या घातक दोऱ्याचा सरसकट बहीष्कार केला व आम्ही साधा सुती दोराच वापरणार ज्यामुळे कोणाचीही जीवीतहानी होणार नाही व पर्यावरणाचे देखील संरक्षण होईल असे ठरवले तर  निर्मिती करणे आपोआपच बंद होईल कारण जे विकत तेच पिकंत़. अजूनही वेळ गेलेली नाही आपल्या चुकीमूळे आपल्याच परिवारातील कोणी याला बळी पडेल याची वाट न पाहता मांजा चा वापर बंद करा़

दरवर्षी २०० पक्ष्यांचा बळी
        मांजामुळे माणसेच नाही पशुपक्षी देखील आपला जीव गमावत आहेत़ दरवर्षी २०० पक्षी मांजामुळे आपला जीव गमावत आहेत़ तर शेकडो पक्षी जखमी होतात़. काही पक्षी कायमचे अपंग होतात़ पंख कापले गेल्यामुळे ते कधीच उडू शकत नाहीत व दुसऱ्या पशुंचे भक्ष्य बनतात़. मुक्या जीवांना आपल्या वेदना सांगता येत नाहीत परंतू निसर्गाचे संतुलन राखण्यासाठी व आपल्याला जीवंत राहण्यासाठी त्यांची किती गरज आहे बहुधा मानवाला याचा विसर पडला आहे़. पक्षीप्रेमी व निसर्गप्रेमी वारंवार  मांजाचा वापर टाळा पर्यावरणाचे व पशुंचे रक्षण करा हे ओरडून सांगत आहेत़ त्यामूळे जागे व्हा आणि या घातक मांजाचा वापर बंद करा़.

 
सरकारने कडक पावले उचलावीत
      हा प्रश्न फक्त राज्यापुरताच मर्यादीत नसून देशभर मांजामूळे होणाºया मृत्यूचे प्रमाण दिवसेंदिवस वाढतच चालले आहे़ केंद्र व राज्य सरकारने याबाबत कडक नियम बनवून त्यांची अमंलबजावणी करणे गरजेचे झाले आहे़ मांजामूळे होणारे मृत्यू बंद करायचे असतील तर मांजा वापरणाºया व्यक्तींवर कडक कारवाई करून त्यांना चांगला दंड ठोठावला पाहिजे़ मांजा विक्रेत्यांवर देखिल कडक कारवाई करणे गरजेचे आहे़ यासाठी लोकांनी सरकारला मदत केली पाहिजे़ आपल्या परिसरात कोणीही मांजा विक्रेता आढळला तर ताबडतोब पोलिसांना कळवावे़ पोलिसांनी देखिल आपल्या जबाबदारीची जाणीव ठेउन अशा लोकांवर गुन्हा दाखल करावा कारण प्रत्यक्षपणे नसले तरी अप्रत्यक्षपणे हे विक्रेते लोकांच्या मृत्यूस कारणीभूत आहेत त्यामूळे यांच्यावर कडक कारवाई होणे अत्यंत गरजेचे आहे़

तरूणांनी पुढाकार घ्यावा
   तरूण पीढीने जर ठरवले तर ते कोणतीही अशक्यप्राय दिसणारी गोष्ट सहज साध्य करु शकतात याचे अनेक दाखले आपण पाहिले आहेत़ तरूणांनी याबाबत गांभीर्याने विचार करून निर्णय घेतला पाहिजे़ सर्वप्रथम त्यांनी मांजाचा वापर बंद करून मांजा वापरणाºया आपल्याच परिसरातील लोकांना जागृत केले पाहिजे़ विक्रेत्यांची माहिती पोलिसांना दिली पाहिजे़ परिसरातील 
विक्रेत्यांना मांजा विकण्यास मज्जाव केला पाहिजे़ ज्या घरातील व्यक्ती या मांजामूळे दगावली आहे त्यांच्या घराला एकदा भेट देउन त्यांची काय परिस्थिती आहे जाणून घ्या तेंव्हाच तुम्हाला या विषयाचे गांभीर्य समजेल़ आज जी परिस्थिती त्यांची आहे ती उद्या आपली किंवा आपल्या परिवारातील व्यक्तींची नसेल हे कशावरून? कारण म्हणतात न की आपले आजचे कर्मच आपले उद्याचे भविष्य निर्धारित करते़ त्यामूळे तरूणांनो जागे व्हा अजूनही वेळे गेलेली नाही आपण अनेक माणसांचेच नाही तर पशुपक्ष्यांचे देखिल जीव वाचवू शकतो़ या संक्रातीला तूमचा एक चांगला निर्णय कोणाला जीवदान देणारा ठरू शकतो़

आमच्या बातम्या WhatsApp वर मिळवण्यासाठी येथे क्लिक करा