जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांचे नविन आदेश

जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांचे नविन आदेश

औरंगाबाद /प्रतिनिधी - कोविड प्रतिबंधात्मक लस हे कवच कुंडल आहे. प्रत्येकाने लस घेणे आवश्यक आहे. जनतेमध्ये लसीबाबत जन जागृती निर्माण होणे आवश्यक आहे.  आरोग्य यंत्रणेने नागरिकांना  कोविड प्रतिबंधक लस  देण्यावर भर देण्याचे निर्देश जिल्हाधिकारी तथा जिल्हा दंडाधिकारी सुनील चव्हाण यांनी दिले आहेत.

        जिल्हाधिकारी कार्यालयात कोविड नियंत्रण आढावा बैठकीत चव्हाण बोलत होते. यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी निलेश गटणे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. डी. एम.मोतीपवळे, डॉ. प्रदीप कुलकर्णी, मनपा आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. पारस मंडलेचा, लसीकरण कक्ष प्रमुख डॉ. महेश लड्डा, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी अजोय चौधरी आदींची उपस्थिती होती.

       प्रत्येक डॉक्टरांनी आलेल्या रूग्णाच्या तपासणीपूर्वी कोविड लस घेतल्याबाबतची नोंद घेऊनच पुढील उपचारास सुरूवात करावी, असे निर्देशही जिल्हाधिकारी चव्हाण यांनी बैठकीत अधिकाऱ्यांना दिले. ग्रामीण भागात होत असलेल्या लसीकरणाची माहिती श्री.गटणे यांनी दिली. तर बालगृह, महिला सुधारगृह आदी ठिकाणी कोविड प्रतिबंधक लस दिल्याचे डॉ. मंडलेचा यांनी यावेळी सांगितले.

आमच्या बातम्या WhatsApp वर मिळवण्यासाठी येथे क्लिक करा