११ मार्चला चित्रपटगृहांमध्ये 'एक नंबर... सुपर'ची धमाल!

११ मार्चला चित्रपटगृहांमध्ये 'एक नंबर... सुपर'ची धमाल!

औरंगाबाद/ प्रतिनिधी - तमाम रसिकांना आवडेल असा मनोरंजनाचा सुपर फार्म्युला गवसलेले दिग्दर्शक मिलिंद कबडे 'टकाटक अभूतपूर्व यशानंतर पुन्हा एकदा एक नवी कहाणी घेऊन प्रेक्षकांच्या भेटीला आले आहेत. ही कहाणी साधी सुधी नसून, एक नंबर.. सुपर आहे.
 कारण मिलिंद कवडेंच्या आगामी चित्रपटाचे शीर्षक एक नंबर सुपर असं काहीसं सुपरहिट वाटावे असे आहे. 'बाबूराव आणि 'तुकडे तुकडे...' या गाण्यावर प्रेक्षक अक्षरशः फिदा झाले आहेत. टिझर ट्रेनर आणि गाण्यांच्या माध्यमातून प्रेक्षकांसोबतच मराठी सिनेगृष्टीही उत्सुकता शिगेला पोहोवणारा एक नंबर सुपर हा चित्रपट ११ मार्च २०२२ रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

नेहमीच प्रवाहापेक्षा काहीतरी वेगळं देण्याच्या पवित्र्यात असलेल्या मिलिंद यांनी 'एक नंबर सुपर या चित्रपटातही तीच परंपरा कायम राखत लेखन-दिग्दर्शनासोबतच निर्मितीचीही धुरा सांभाळत एक नवे पाऊल टाकले आहे. महेश शिवाजी धुमाळ आणि जितेंद्र शिवाजी धुमाळ यांच्या साथीनं मिलिंद यांनी धुमाल प्रोडक्शनच्या बॅनरखाली आउट ऑफ द बॉक्स फिल्म्सच्या सहयोगानं 'एक नंबर सुपरची निर्मिती केली आहे. या चित्रपटाच्या निमित्तान मिलिंदनं पुन्हा एकदा काही जुन्या सवंगड्यांना तर काही नवोदितांना साथीला घेऊन नावीन्यपूर्ण प्रयोग केल्याच प्रेक्षकांना पहायला मिळणार आहे. मराठी सिनेसृष्टीतील सध्याचा हुकूमी एक्का मानला जाणारा प्रथमेश परब टकाटकच्या यशानंतर पुन्हा मिलिंद यांच्या एक नंबर सुपरमध्ये मुख्य भूमिकेत झळकणार आहे. दोन्ही गाण्यांतील प्रथमेशचा परफॉर्मन्स चांगलाच भावला आहे. आता प्रत्यक्ष सिनेमाच्या माध्यमातून प्रथमेश रसिकाच्या मनावर राज्य करण्यासाठी सज्ज झाला आहे.
  एक नंबर सुपरटायटलवरून चित्रपटाच्या कथानकाचा जराही अंदाज लावता येत नाही त्यामुळेच दिवसागणिक या चित्रपटाची उत्सुकता अधिकाधिक वाढत आहे. विनोदी अंगाने भाष्य करणार कथानक आणि त्याला साजेसा कलाकारांचा उत्तम अभिनय हे या चित्रपटाचे मुख्य आकर्षणाचे केंद्र आहे. प्रत्येक कॅरेक्टरची वेगळी ओळख, मुख्य कलाकारांच्या साथीला सहकलाकारांची लक्षवेधी कॅरॅक्टर कथेच्या प्रवाहाशी एकरूप होऊन काम करतात. मनोरंजन करणारी गाणी, अर्थपूर्ण शब्दरचना, मनमोहक संगीतरचना, उत्कंठावर्धक पटकथा लेखन. मनाला भिडगार संवादलेखन आणि दर्जेदार निर्मितीमूल्यांच्या साथीनं दिग्दर्शित केलेला एक उत्तम सिनेमा असे एक नंबर सुपर'चे वर्णन करता येईल.

या चित्रपटात मिलिंद शिंदे, गणेश यादव, निशा परुळेकर, अभिलाषा पाटील, आया ऋषिकेश धामापूरकर, अक्षता पाडगावकर, प्रणाली संघमित्रा डावरे, सुमित भोक्से, सुनिल मगरे, हरिष थोरात, आकाश कोळी आदी कलाकारांच्या भूमिका आहेत. निर्मिती आणि दिग्दर्शनासोबतच या चित्रपटची कथा-पटकथा लिहिणारे मिलिंद म्हणाले की, 'एक नंबर.. सुपर'च्या माध्यमातून आम्ही एक परीपूर्ण मनोरंजक चित्रपट बनवला आहे. चहूबाजूंनी प्रेक्षकांना मनोरंजनाची जणू मेजवानी असलेला हा चित्रपट प्रेक्षकही सर्वार्थाने 'एक नंबर... सुपर' ठरवतील अशी आशा आहे. माझ्या आजवरच्या चित्रपटांप्रमाणेच विनोदाच्या सहाय्याने एक महत्त्वपूर्ण विचार समाज आणि जनमानसापर्यंत पोहोचवण्याचा पर्यंत एक नंबर... सुपर हा चित्रपट करेल अशी आशाही मिलिंद यांनी व्यक्त केली. संजय नवगिरे यांनी या चित्रपटाचं संवादलेखन केलं आहे. पार्श्वसंगीत अभिनय जगताप यांनी पार्श्वसंगीत दिलं आहे. तर संकलनाची बाजू प्रणव पटेल यांनी सांभाळली आहे. पटकथा महाय्यक म्हणून संजय नवगिरे आणि सुनिल मगरे यांनी काम पाहिले असून, डिओपी हजरत शेख (वली) यांच्या अनोख्या सिनेमॅटोग्राफीच्या माध्यमातून एक नंबर.. सुपर' हा चित्रपट प्रेक्षकांना पहायला मिळणार आहे.

आमच्या बातम्या WhatsApp वर मिळवण्यासाठी येथे क्लिक करा