पुण्यातील भीषण अपघाताचे खरे कारण कळले
पुणे /प्रतिनिधी - पुण्यात काल रात्री मोठी दुर्घटना घडली. नवले ब्रिज येथे भीषण अपघात झाला होता. यात एका भरधाव कंटेनरने एक-दोन नाही तर तब्बल 48 पेक्षा अधिक वाहनांना धडक दिल्याने भीषण अपघात झाला.
आता या नवले पुलावर झालेल्या अपघाताच्या तपासात मोठा खुलासा झाला आहे. समोर आलेल्या माहितीनुसार, कंटेनरचे ब्रेक फेल झाल्यानं हा अपघात झाल्याचं म्हटलं जात होतं. मात्र, कंटेनरचे ब्रेक फेल झालं नसल्याचं तपासात उघड झालं आहे. तर, चालकाने गाडी न्यूट्रल करून उतारावर इंजिन बंद करून गाडी चालवल्याने हा प्रकार घडला असल्याचं समोर आलं आहे.
या अपघातानंतर चालक अजूनही फरार आहे. पुणे शहरातील कायम व्यस्त असलेल्या नवले पुलावर झालेल्या भीषण अपघातात आत्तापर्यंत एकूण 48 वाहने समाविष्ट असल्याचे समजले आहे. किमान 10 जखमींवर शासकीय रुग्णवाहिका 108 मध्ये उपचार केल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे. गर्दीच्याच वेळी या कंटेनरने अनेक वाहनांना धडक दिली.
आणखी दोन भीषण अपघात -
दरम्यान, नवले ब्रिजच्या भीषण अपघातानंतर स्वामी नारायण मंदिराजवळ दुसरा भीषण अपघात झाला. या अपघातात तब्बल सात गाड्यांना टेम्पोने उडवले. यानंतर आणखी एक भीषण अपघात कात्रज रस्त्यावर
उडवले. यानंतर आणखी एक भीषण अपघात कात्रज रस्त्यावर झाला. दुचाकीच्या झालेल्या या तिसऱ्या भीषण अपघातात दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला आहे. तर इतर दोन्ही घडलेल्या भीषण अपघातात एकाचाही मृत्यू नाही. मात्र, 48 गाड्यांच्या अपघातात तिघे गंभीर झाल्याची माहिती समोर आली आहे.