10 विचा निकाल उद्या जाहीर होणार
औरंगाबाद/ प्रतिनिधी - 17 जून रोजी दहावीचा निकाल जाहीर करण्यात येणार आहे. गेल्या आठवड्यात महाराष्ट्र बोर्डाचा बारावीचा निकाल जाहीर झाला. अशातच आता दहावीची परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांना आणि पालकांना निकालाची उत्सुकता लागली होती. महाराष्ट्र स्टेट बोर्ड ऑफ सेकेंडरी अँड एज्युकेशन (MSBSHSE) मार्फत उद्या दहावीचे निकाल जाहीर केले जाणार आहेत. दुपारी एक वाजता ऑनलाइन निकाल जाहीर होणार आहे. त्याआधी सकाळी 11 वाजता महाराष्ट्र बोर्डाची पत्रकार परिषद होणार आहे.
दहावीच्या परीक्षेत 1,449,660 विद्यार्थी सहभागी
दहावीची परीक्षा 15 मार्च ते 4 एप्रिल दरम्यान घेण्यात आली होती. यामध्ये सुमारे 1,449,660 विद्यार्थी सहभागी झाले होते. दहावीच्या परीक्षेसाठी एकूण 16 लाख 39 हजार 172 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. यामध्ये 8 लाख 89 हजार 584 विद्यार्थी तर 7 लाख 49 हजार 487 विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती. त्यामुळे दहावीचा निकाल कधी लागणार याकडे विद्यार्थी आणि पालक डोळे लावून बसले आहेत. मीडिया रिपोर्ट्सनुसार, यावर्षी बोर्ड परीक्षेचा निकाल 15 जून रोजी जाहीर केला जाणार आहे. मात्र, याबाबत बोर्डानं अद्याप काहीही सांगितलेलं नाही. तर गेल्या महिन्यात राज्याच्या शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी महाराष्ट्र दहावीचा निकाल 20 जूनपर्यंत जाहीर केला जाईल, असं सांगितलं होतं.
उद्या 17 जून रोजी दहावीचा निकाल जाहीर करण्यात येणार आहे. गेल्या आठवड्यात महाराष्ट्र बोर्डाचा बारावीचा निकाल जाहीर झाला. अशातच आता दहावीची परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांना आणि पालकांना निकालाची उत्सुकता लागली होती. महाराष्ट्र स्टेट बोर्ड ऑफ सेकेंडरी अँड एज्युकेशन (MSBSHSE) मार्फत उद्या दहावीचे निकाल जाहीर केले जाणार आहेत.