वैजापूरात उभाणार बायो सीएनजी प्रकल्प शेतक-यांना होणार मोठा फायदा

वैजापूरात उभाणार बायो सीएनजी प्रकल्प शेतक-यांना होणार मोठा फायदा

औरंगाबाद, दि. २६ प्रतिनिधी- इंधन दरवाढ आणि वाढते प्रदुषणाला आळा घालण्यासाठी केंद्र सरकारने देशात तालुकानिहाय बायो सीएनजी प्रकल्प सुरू करण्याचा निण-या घेतला आहे. एमसीएल सलग्न वैजामहिमा प्रोड्युसर कंपनी लिमिटेडच्या माध्यमातून हा प्रकल्प वैजापूर तालुक्यात सुरू होत असून या प्रकल्पाच्या माध्यमातून शेतक-यांना बळ देण्याचे तसेच कंपनीतून रोजगार निर्मिती होणार असल्याचे प्रतिपादन कंपनीचे संचालक संतराम घेर यांनी केले.
वैजापूर तालुक्यात वैजामहिमा प्रोड्युसर कंपनी लिमिटेडच्या माध्यमातून तब्बल १० एकर जागेवर बायो सीएनजी कंपनी उभी राहणार आहे. तालुक्यातील शेतक-यांना नेपिअर गावत लागवडीसाठी दिल्यानंतर या गवतापासून बायो सीएनजी प्रकल्प सुरू होणार आहे. त्यामुळे इतर पिकांच्या शाश्वत उत्पन्नाची कुठलीच हमी नसताना कंपनीमाफत दिल्या जाणा-या नेपिअर गवताच्या लागवडीतून शेतक-यांचे उत्पन्नात मोठी वाढ होणार आहे. तसेच या कंपनीमुळे तालुक्यातील जवळपास २ हजार हुन अधिक कुशल, अकुशल कामगारांना मोठी संधी निर्माण होईल असा विश्वास कंपनीचे संचालक संकेत बाळू तांबोळी यांनी व्यक्त केला.
दरम्यान, वैजामहिमा प्रोड्युसर कंपनीने तालुक्यातील गावांगावामध्ये एमव्हीपी नियुक्त केले आहे. या एमव्हीपीच्या माध्यामातून गावपातळीवर सभासद नोंदणी सुरू आहे. या कंपनीत सभासद होण्यासाठी शेतक-यांनी पसंती दर्शविली असून जास्तीत जास्त शेतक-यांनी सभासद नोंदणी करून घ्यावे असे आवाहन कंपनीच्या संचालक मंडळांनी केले आहे.

असा होणार शेतक-यांना फायदा
या प्रकल्पात नेपिअर गवतापासून बायो सीएनजी, बायो पीएनजी निर्मिती प्रक्रिया करण्यात येणार आहे.या हत्ती गवताला गिनिगोल, नेपिअर गवत देखील ओळखले जाते तसेच या गवताचा उपयोग चारा म्हणून करतात. मात्र या गवतापासून आता सीएनजी, पीएनजी व सेंद्रिय खत निर्मिती होणार आहे. हे गवत साधारण दोन महिन्यात १५ ते २० फुटांपर्यंत वाढते तीन महिन्यात एकदा कापणी केली तरी साधारणपणे वर्षातून चार वेळा कापणी होणार आहे. एक एकर मध्ये किमान १५० ते २०० टन उत्पादन शेतक-याला यातून मिळणार आहे. या गवताला प्रती टन भाव हा एक हजार रुपये असणार आहे. त्यामुळे शेतक-यांना मोठा फायदा होईल असा विश्वास  कंपनीचे संचालक  देविदास ञिंबके  यांनी  व्यक्त केले

आमच्या बातम्या WhatsApp वर मिळवण्यासाठी येथे क्लिक करा