असे काय झाले की मृतदेह रस्त्यावरच सोडून पळाले

असे काय झाले की नातेवाईक अंत्ययात्रेदरम्यान मृतदेहाला सोडून पळत सुटले. जळगावच्या पारोळा तालुक्यातून अशीच एक धक्कादायक घटना समोर आली आहे. अंत्ययात्रेवेळी नातेवाईकांची चांगलीच धावपळ उडाली. पारोळा तालुक्यातल्या नगाव गावामध्ये अंत्ययात्रेदरम्यान नातेवाईक आपला जीव वाचवण्यासाठी मृतदेहाला सोडून पळते सुटले .
नगाव गावात स्मशान भूमीकडे जात असलेल्या अंत्ययात्रेत सहभागी नागरिकांवर अचानक मधमाशांनी हल्ला केल्याची घटना घडली आहे. अंत्ययात्रा सुरू असताना मधमाशांनी अचानक हल्ला केला. त्यामुळे नागरिकांची एकच धावपळ उडाली. या घटनेत तीन जण गंभीर जखमी झाले आहेत.
नगाव गावात स्मशान भूमीकडे जात असलेल्या अंत्ययात्रेत सहभागी नागरिकांवर अचानक मधमाशांनी हल्ला केला. अचानक हल्ला झाल्यामुळे नातेवाईकांची एकच धावपळ उडाली. मृतदेह रस्त्यातच सोडून नातेवाईक वाट सापडेल तिकडे पळत सुटले. या घटनेत तीन जण गंभीर जखमी झाले आहेत.
दरम्यान मधमाशांच्या हल्ल्यामध्ये तीन जण गंभीर जखमी झाले आहेत, तर काही जण हे किरकोळ जखमी झाले आहेत. मधमाशांच्या हल्ल्यात गंभीर जखमी असलेल्या तीन जणांना उपचारासाठी पारोळा येथील कुटीर रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे, त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. साधु भागा भिल वय 75, ओंकार शंकर भिल वय 65, मधुकर सजन भिल वय 55, तिघे राहणार नगाव ता. पारोळा अशी या घटनेत गंभीर जखमी झालेल्या व्यक्तींची नावं आहेत. त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहे.