पाण्याचा वाद पोलीस ठाण्यात काय आहे नागरिकांचा आरोप?
औरंगाबाद/ प्रतिनिधी - शहरातील लक्ष्मीकॉलनी अशोकनगर या भागात पाणी पुरवठा होत नसल्याने संतप्त नागरिकांनी पाणी सप्लाय करणाºया लाईनमन घरी जाऊन त्याचा सह घरातील मंडळींना मारहाण केल्याचा आरोप करत,नागरिकाच्या विरोधात पोलीस स्टेशनमध्ये तकार दिली आहे.
शहरातील लक्ष्मीकॉलॉनी अशोकनगर ,प्राध्यानगर आदी भागांत जबुली पार्क जलकुंभा वरून पाणी सप्लाय केला जातो ,हा सप्लाय आठवडयातून 6 व्या दिवशी करून पाणी सोडणारा लाईनमन कृष्णा स्वामी राजीय कुमो परिसरातील एका भागात जास्त पाणी पुरवठा करतो तर दुसºया भागात कमी आणि काही सप्लाय करतच नसल्याचा आरोप करत येथील नागरिकांनी कृष्णा ला फोन वर संपर्क केला ,फोन बंद असल्याने,त्याला शोधण्यासाठी रहिवाशी रविवारी रात्री 10 वाजेच्या सुमारास ज्युबली पार्क पाण्याचा जलकुंभा वर धाव घेतली ,इकडे कृष्णा दिसला नाही म्हणून शेजारी असलेला मनपा क्टार्टरच्या त्याचा राहत्या घरी जाऊन पाणी पुरवठा का? नाही केला असा सवाल करत त्याला व त्याचा घराच्या ना धकबुकीं करत मारहाण केली असा आरोप कृष्णा आणि पाणी पुरवठा कर्मचारी यांनी केला. या विषय बेगमपुरा पोलीस स्टेशनमध्ये जाऊन संबंधित मारहाण करणाºया विरोधात तकार दिली.सध्या पाणी सप्लाय कमी दाबाने होत आसून टाकी भरण्यास उशीर होतो ,व काही भागात पाणी उशिरा पाणी सोडण्यात येते ,याचा राग नागरिक पाणी पुरवठा करणाऱ्या कर्मचाऱ्यां वर काढतात व कधी शिवीगाळ करून मारहाण पण करतात असा आरोप पाणी पुरवठा युनियन यांनी केला आसून पाणी सप्लाय करणारा कोणताही कर्मचारी नागरिकांकडून पैसे वैगरे घेत नाही अशी प्रतिक्रिया युनियन ने दिली आहे. तर लक्ष्मी कॉलोनी मधील महिलांनी नागरिकांनी मनपा कर्मचाºयांचा विरोधात पोलीस स्टेशनमध्ये धाव घेत तकार दाखल केली आहे. या मनपा मधील पाणी पुरवठा करणारे कर्मचारी पैसे देउन सुद्धा पाणी सोडत नाही व मनमानी करत असल्याचा आरोप केला आहे. उन्हाळ्याची चाहूल लागताच पाण्याची मागणी वाढली आहे,सध्या शहरात विविध ठिकाणी पाणी कमी दाबाने तर काही भागात 8 दिवसांनी होत असल्याने नागरिकाचा रोष वाढत चालला आहे ,येत्या काही दिवसात नागरिक व मनपा पाणी पुरवठा कर्मचारी यांच्यात आणखी वाद निर्माण होण्याची शक्यता आहे