संगीता साबळे यांना आदर्श शिक्षिका पुरस्कार

संगीता साबळे यांना आदर्श शिक्षिका पुरस्कार

छत्रपती संभाजीनगर /  प्रतिनिधी  - वाळूज औद्योगिक परिसरातील स्वर्गीय भैरोमल  तनवाणी प्राथमिक विद्यालयातील  समन्वयक संगीता प्रल्हाद साबळे (आवारे) यांना आदर्श शिक्षिका पुरस्कार (दि.21) रोजी अब्दुल कलाम आझाद संशोधन केंद्र याठिकाणी प्रदान करण्यात आला.
 दैनिक अजिंक्य केसरी च्या वर्धापन दिनानिमित्त संगिता साबळे यांना आदर्श शिक्षिका पुरस्कार प्रदान करण्यात आला.  यावेळी डॉ जीवनजी राजपुत , प्रा. डॉ. बाळासाहेब वाल्हेकर , एच. आर बोरणार, नंदा गायकवाड , संपादक  समाधान वाणी, उपसंपादक उमेश नेमाडे, संजय साठे, आभार प्रदर्शन प्रा अर्जुन रसाळ  विलास खोतकर , प्रा. बी. डी. खोतकर , शकुंतला साबळे, किशोर दनके, अशोक शेजुळ, अँड तेजराव आवारे उपस्थित होते. या अनुषंगाने वाळूज महानगर परीसरातून अभिनंदन करून कौतुक केले जात आहे

आमच्या बातम्या WhatsApp वर मिळवण्यासाठी येथे क्लिक करा