पाण्यासाठी भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा एल्गार

औरंगाबाद / प्रतिनिधी -  बापु नगर व पैठणगेट येथील ढोलवाली गल्लीतील पाणी प्रश्न तातडीने सोडवा या मागणीसाठी  बापूनगर ते मनपा टाऊन हॉल कार्यालय पदयाञा काढण्यात आली. मागण्या मंजूर न झाल्यास  वारंवार पदयाञा  काढुन आंदोलन  करुत असा इशाराच भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या खोकडपुरा शाखेने दिला आहे. आयुक्त, उपायुक्त अभियंते अनुपस्थित होते. याबाबतचे निवेदन उशिरा पाणी प्रश्नाचा संबंध नसलेल्या मनपा उपायुक्त नंदा गायकवाड यांनी स्विकारले. यावेळेस मोठ्या संख्येत महीला रिकामा हंडा आणि विळा ओम्बीचा लाल झेंडा घेऊन उपस्थित होत्या.

याबाबत असे की, पाणी प्रश्नावर महानगरपालीका अजुनही गंभीर नसल्याचा आज पुन्हा प्रत्यय आला आयुक्त व उपायुक्तांच्या खुर्च्या रिकाम्या होत्या.  उशिराने पाणी प्रश्नाचा संबंध नसलेल्या उपायुक्त मनपा उपायुक्त नंदा गायकवाड यांनी निवेदन स्विकारले. गेल्या अनेक वर्षांपासुन बापूनगर वार्ड क्र. ५४ ची शेवटची गल्ली व पैठणगेट वार्ड क्र. ५५ ची ढोलवाली गल्लीतील नळांना पाणी नाही. नळ कोरडे असतात, त्यातून फक्त हवा येते. काही ठिकाणी पाणी येते तर ते दुषित, ड्रेनेजचा वास येणारे घाण पाणी येते. त्यामुळे या परिसरातील लोक आजारी पडतात. बापूनगरच्या सर्व गल्लीत एकाच वेळी पाणी येत नाही. मधल्या गल्लीला कमी दाबाने पाणी येते तर शेवटच्या गल्लीला अजिबात पाणी येत नाही. पैठणगेट येथील ढोलवाली गल्लीत आपल्या अभियंत्यांनी अनेक ठिकाणी खोदून पाहीलं परंतू वॉल सापडत नाही, फॉल्ट सापडत नाही, मनपाकडे पाईपलाईन व वॉल्व्हचा नकाशा देखील नसावा, ही अत्यंत संतापजनक बाब आहे. नकाशे नसल्यामुळे अभियंते रस्ता खोदून पाहतात व खोदल्यानंतर वॉल्व्ह व पाईपलाईन सापडत नाही. त्यामुळे सरकारी पैसा वाया जातो. वेळ वाया जातो आणि पाणी पूरवठ्याच्या कामाला अक्षम्य दिरंगाई होते. पाणीपुरवठा करणारे कर्मचारी प्रेशर नाही म्हणून वरिष्ठांकडे बोट दाखवतात. वरिष्ठ अधिकारी सांगतो, बोलतो, करतो असे बोलत राहातात. पाणीपुरवठ्याची व्यवस्था पारदर्शक नाही, ही आजारी व्यवस्था आहे. त्यास बदलण्याची गरज आहे. असे निवेदनात नमुद आहे.
बापूनगर व पैठणगेट, ढोलवाली गल्ली येथील नळ पाईपलाईन व वॉल्व्हचा तातडीने नकाशा तयार करा, अनावश्यक वॉल्व्ह काढून टाका, गरज पडल्यास नवीन पाईपलाईन टाका, प्रेशर वाठवा. सर्व गल्ल्यांना एकाच वेळी, सारख्या दाबाने वीज असेल अशा वेळी किमान सलग ३ तास पाणीपुरवठा करा.

बापूनगर भागात नवीन ड्रेनेज लाईन टाका, चोकअप काढण्याचे काम अत्यावश्यक असल्याने अधिक जेटींग मशिन वाहन खरेदी करा. त्या जेटींग बापूनगर सारख्या झोपडपट्यांना प्राधान्याने पाठवा.सफाई कर्मचार्‍यांची संख्या वाढवा. त्याच बरोबर बापूनगर भागातील ड्रेनेज लाईन ही ४०-५० वर्ष जूनी झाली असल्याने ती वारंवार चोकअप होते, सफाई कामगार जेटींग मशिनशिवाय होणार नाही, असे म्हणतात तर जेटींग मशिन महीना-पंधरा दिवस येत नाही. त्यामूळे प्रातःविधीसाठी पाहुण्यांकडे जाण्याची वेळ नागरिकांवर येते. या मागण्यांचे निवेदन भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या खोकडपुरा शाखेतर्फे पाणी प्रश्नाचा संबंध नसलेल्या मनपा उपायुक्त नंदा गायकवाड यांना देण्यात आले .
८ दिवसात  मागण्या मंजूर न झाल्यास मनपा टाऊन हॉल कार्यालयापर्यंत वारंवार पदयात्रा काढण्यात येईल असा इशाराही भाकपने दिला आहे.  यावेळेस मोठ्या संख्येत महीला विळा ओम्बीचे लाल झेंडे व रिकामे हंडे घेऊन मनपा टाऊन हॉल कार्यालयासमोर उपस्थीत होत्या. निवेदनावर ऍड. अभय टाकसाळ (जिल्हा सचिव भाकप) कॉ. अनिता हिवराळे (शाखा सहसचिव)
कॉ. मनिषा भोळे (शाखा सचिव) कॉ. राजु हिवराळे (संघटक), पुष्पाबाई बिरारे , मंडाबाई नवगिरे , बाबुलाल वाघ, मिलींद जाधव, जया दाभाडे, कविता गायकवाड, शिलाबाई दीवे, रंजना बनसोडे, शिलाबाई प्रधान, सुकन्या प्रधान, मनिषा जावळे, सुनिता नरवडे, नीता खरात, अरुणाबाई गायकवाड इ च्या सह्या आहेत.

आमच्या बातम्या WhatsApp वर मिळवण्यासाठी येथे क्लिक करा