अल्पवयीन मुलांचा पाण्यात बुडून मृत्यू
ठाणे /प्रतिनिधी - ठाणे येथील उपवन, रामबाग फायरिंग स्टेशनजवळ असलेल्या डबक्यातील पाण्यात दोन अल्पवयीन मुले बुडाल्याची घटना शनिवारी दुपारी समोर आली असून दोन्ही मृतदेह बाहेर काढण्यात ठाणे महापालिका प्रादेशिक आपत्ती व्यवस्थापन, टीडीआरएफ आणि अग्निशमन दलाला यश आले आहे.गौतम वाल्मिकी (१२) आणि निशू वाल्मिकी (१५) अशी त्या दोघांची नावे आहेत.
उपवन फायरिंग स्टेशनजवळील डबक्यातील पाण्यात दोघे जण बुडल्याची माहिती मिळताच टीडीआरएफ, आपत्ती व्यवस्थापन, वर्तक नगर पोलीस आणि अग्निशमन दल या विभागाने तातडीने घटनास्थळी धाव घेत शोध कार्य सुरू केले. काही तासात त्या बुडालेल्या दोघांचे मृतदेह शोध काढण्यात यश आले असून ते पोलिसांच्या स्वाधीन केले आहे. शवविच्छेदनासाठी मृतदेह रुग्णालयात पाठविण्यात आले आहेत.