सदस्य नोंदणीला शिवसैनिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद 

सदस्य नोंदणीला शिवसैनिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद 

गडचिरोली/ प्रतिनिधी - शिवसेना पक्षप्रमुख  उद्भव ठाकरे यांच्यावर विश्वास ठेऊन शिवसेना प्राथमीक सदस्य नोंदणीला आरमोरी विधानसभा क्षेत्रातर्गत देसाईगंज येथे शिवसेना कार्यालयात  सुरुवात करण्यात आली.
      शिवसेना जिल्हाप्रमुख सुरेंद्रसिह चंदेल यांच्या मुख्य उपस्थितीत  देसाईगंज तालुक्यातील शिवसैनिकांचे प्राथमीक सदस्य नोंदणी फॉर्म भरण्यात आले.तालुक्यातील सर्वच भागातील शिवसैनिकांनी या सदस्य नोंदणीला भरघोस प्रतिसाद दिला.  शिवसेना ही शिवसैनिकांच्या बळावर मोठी झाली असुन सर्व तळागाळातील शिवसैनिकांनी एकजुटीने पक्षप्रमुख उद्भव ठाकरे यांचे हाथ बळकट करू,शिवसेनेला छोटे मोठे संकट झेलण्याची ताकद ही बाळासाहेबांच्या आशीर्वादामुळे प्राप्त झाली असल्याचे या वेळी जिल्हाप्रमुख सुरेंद्रसिह चंदेल यांनी आपल्या मार्गदर्शनात सांगितले.
   यावेळी शिवसेना समन्वयक भरत जोशी,उपजिल्हाप्रमुख अविनाश गेडाम,तालुकाप्रमुख नंदू चावला,माजी जिप सदस्य डिगाम्बर मेश्राम, शहरप्रमुख विकास प्रधान, माजी ताप्रमुख बालाजी ठाकरे,उपसरपंच प्रभाकर चौधरी,धनराज तुरणकर, सुरुज कार,विलास मेश्राम,पवन राऊत,चंद्रमनी खोब्रागडे व शेकडो शिवसैनिक उपस्थित होते.

आमच्या बातम्या WhatsApp वर मिळवण्यासाठी येथे क्लिक करा