त्या तरुणीच्या हत्याऱ्याला लासलगावातून अटक पोलिसांच्या पथकाला यश

त्या तरुणीच्या हत्याऱ्याला लासलगावातून अटक  पोलिसांच्या पथकाला यश

औरंगाबाद/प्रतिनिधी - एकतर्फी प्रेमातून महाविद्यालयीन तरूणीचा गळा चिरून निर्घुण खून करणाऱ्या शरणसिंग सेठी या हत्या करणाऱ्या तरूणाला गुन्हे शाखेच्या पथकाने नाशिक जिल्ह्यातील लासलगाव येथून रविवारी दुपारी अटक केली. खुनाच्या घटनेनंतर शरणसिंग दुचाकी सोडून ट्रकमध्ये बसून लासलगाव येथे राहणाऱ्या बहिणीच्या घरी गेला होता. गुन्हे शाखेचे उपनिरीक्षक अमोल मस्के यांचे पथक त्याच्या मागावर होते. दुपारी 12 वाजण्याच्या सुमारास तो बहिणीच्या घरी पोहोचताच पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. शरणसिंगला घेऊन गुन्हे शाखेचे पथक औरंगाबादकडे रवाना झाले असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.

गुरुगोविंदसिंहपुरा, गुरुद्वारा समोरील सुखप्रितसिंग कौर  प्रितपालासिंग (19) ही देवगिरी महाविद्याल्यात बीबीए च्या पहिल्या वर्गात शिक्षण घेत आहे. नेहमीप्रमाणे ती शनिवारी सकाळी मैत्रीण दिव्या खटलानी सोबत दुचाकीने कॉलेजला गेली होती. सकाळी 11 वाजेपासुन त्याचा जुना ओळखीचा शरणसिंग सेठी (20) हा सुखप्रितसिंग कौर ला भेटण्यासाठी कॉलेजला आला. मागील कारणावरुन दोघांत वाद झाला.

वादानंतर शरणसिंगने तिला एका हॉटेलमध्ये चलण्याचा आग्रह केला. मात्र तिने नकार दिल्याने त्याने तिची दुचाकीची किल्ली आणि मोबाईल हिसकावुन घेत रोडवरील इमोजी कॅफेमध्ये गेला. त्या ठिकाणी सुखप्रितसिंग कौर  दिव्यासोबत कॅफे मध्ये गेली. सुखप्रितसिंग कौर  आणि शरणसिंग हे दोघे वरच्या मजल्यावर कॉफी पित बसले होते. त्या ठिकाणी दोघात वाद झाला. वादानंतर शरणसिंग याने सुखप्रितसिंग कौर  हिला फरफटत नेत हॉटेल समोरील एस.एम. शिरसाट यांच्या मोकळ्या प्लॉटवर नेत खिशातील कृपान काढून तिचा गळा चिरला. ती रक्ताच्या थारोळ्यात पडताच शरणसिंगने दुचाकीने पळ काढला. शहरातील देवगिरी महाविद्यालयाजवळ शनिवारी भरदुपारी घडलेल्या या घटनेने एकच खळबळ उडाली होती. एकतर्फी प्रेमातून तरूणीचा गळा चिरणाऱ्या माथेफिरूला अटक करण्यात औरंगाबाद गुन्हे शाखेच्या पोलिसांना यश आले आहे.

आमच्या बातम्या WhatsApp वर मिळवण्यासाठी येथे क्लिक करा