दुचाकींची समोरासमोर धडक एक जण जागीच ठार

दुचाकींची समोरासमोर धडक एक जण जागीच ठार

भोकरदन / प्रतिनिधी - भोकरदन-सिल्लोड मुख्य रस्त्यावरील मुठाड पाटीजवळ  बुधवार दि. ९ मार्च रोजी दुपारी साडेतीन वाजेच्या सुमारास  दोन दुचाकींच्या समोरासमोर झालेल्या अपघातात एक जण जागीच ठार झाला. ही घटना  घडली.
भिमराव रामा राऊत (वय ६०) असे या अपघातात ठार झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. मिळालेल्या माहितीनुसार सिल्लोड तालुक्यातील बाळापूर येथील भिमराव राऊत हे न्यायालयाच्या कामानिमित्त भोकरदन येथे आले होते. काम आटोपल्यानंतर दुपारी ते दुचाकीने गावाकडे जात असतांना भोकरदन-सिल्लोड मुख्य रस्त्यावरील मुठाड पाटीजवळ सिल्लोडकडून येणारी दुचाकी त्यांच्या दुचाकीला धडकली.

आमच्या बातम्या WhatsApp वर मिळवण्यासाठी येथे क्लिक करा