बिपाशा बासू आणि करण सिंह ग्रोवरच्या घरी हलणार पाळणा!

बिपाशा बासू आणि करण सिंह ग्रोवरच्या घरी हलणार पाळणा!

मुंबई: आलिया भट्ट आणि रणबीर कपूरनंतर आता बॉलिवूडमधील आणखी एक कपल लवकरच आई-बाबा होणार आहेत. अभिनेत्री बिपाशा बासू आणि अभिनेता करण सिंह ग्रोवर लवकरच आई बाबा होणार असल्याच्या चर्चा सध्या जोरदार सुरू आहेत. बिपाशा आणि करणच्या लग्नाला जवळपास सहा वर्ष पूर्ण झाली आहेत. सहा वर्षानंतर दोघांच्या घरी पाळणा हलणार असल्याचं बोललं जातंय.

एप्रिल २०१६ साली बिपाशा आणि करण विवाहबंधनात अडकले होते. कुटुंबिय आणि मित्र परिवाराच्या उपस्थितीत अगदी खासगी पद्धतीने दोघांचा लग्न सोहळा पार पडला होता. लग्नानंतर अनेकदा बिपाशा गरोदर असल्याच्या अफवा उडाल्या होत्या. मात्र बिपाशा आणि करणने वेळोवेळी या अफवांचं खंडन केलं. पिंकविलाच्या वृत्तानुसार, करण बिपाशा लवकरच आई-बाबा होणार असल्याची आनंदाची बातमी चाहत्यांना देणार आहेत. सूत्रांच्या माहितीनुसार सध्या दोघंही आयुष्याच्या आनंदी टप्प्यात असून आई वडिल बनण्यासाठी उत्तुक आहेत.

 ‘अलोन’ सिनेमाच्या वेळी बिपाशा आणि करणची ओळख झाली होती. त्यानंतर दोघांमध्ये जवळीक वाढली. करणचं बिपाशासोबतच हे तिसरं लग्न आहे. याआधी त्याने अभिनेत्री श्रद्धा निगम आणि जेनिफर विंगेटशी लग्न केलं होतं. मात्र ही दोन्ही लग्न फार काळ टिकू शकली नाहीत. बिपाशाला एक वर्ष डेट केल्यानंतर करण आणि बिपाशाने लग्न केलं. दोघांच्या लग्नाला आता सहा वर्ष पूर्ण झाली आहेत.

 बिपाशा आणि करण सध्या बॉलिवूडपासून दुरावले आहेत. ‘कुबूल है 2.0‘ मध्ये करण ग्रोवर झळकला होता. तर बिपाशा ‘डेंजरस’ या वेब सीरिजमध्ये झळकली होती. दोघंही सोशल मीडियावर मात्र चांगलेच सक्रिय असतात.

 

 

 

 

आमच्या बातम्या WhatsApp वर मिळवण्यासाठी येथे क्लिक करा